अहमदनगर (दि १ ऑक्टोबर २०२०) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मी जिल्हा दण्डाधिकारी म्हणून ३१ ऑक्टोबर पर्यंत अहमदनगरला कलम १४४ लागू करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर केलेल्या आदेशानुसार मिळाली आहे या आदेशानुसार पुढील प्रमाणे नियम लागू असतील
१) सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई २) अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामासाठी व्यक्तींच्या हालचालीवर / फिरण्यावर रात्री ९:०० ते सकाळी ५:०० या कालावधीत निर्बंध राहतील ३) कंटेनमेंट झोन मध्ये लागू असलेले सर्व नियम कायम राहतील ४) अहमदनगर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील ५) सिनेमा हॉल,जलतरण तलाव मनोरंजन पार्क इत्यादी ठिकाणे बंद राहतील ६) सर्व सार्वजनिक कार्यक्रम जमाव करून एकत्र करण्यावर बंदी राहिल ७) सर्व बिगर अत्यावश्यक बाजारपेठा / दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहतील कोणतीही व्यक्ती संस्था संघटना आदेशाचे उल्लंघन करेल त्यावर भारतीय दण्ड विधान संहिता नुसार कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दण्डधिकारी यांनी काढले