नवी दिल्ली (दि ५ सप्टेंबर २०२०) : हजरत निजामुद्दीन दर्गा ६ सप्टेंबरपासून भाविकांसाठी खुला होणार आहे. दर्गा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. कोविड-१९ लॉकडाउनमुळे दर्गा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता जरी तो खुला होत असला तरी या ठिकाणी कोविड-१९ आजारासंदर्भातील सर्व काळजी येथे घेतली जाणार असून सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले जाणार आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे प्रभारी सय्यद आदिब निझामी म्हणाले, “दर्गा ६ सप्टेंबरपासून खुला होत आहे. दरम्यान, कोविड संदर्भात सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची तयारी केली आहे. लॉकडाउनमध्ये आम्ही दर्गा बंद ठेवला होता. मात्र, आता सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही दर्गा खुला करत आहोत.”