
अहमदनगर (दि २५ ऑगस्ट २०२०)।- जिल्ह्यात कार्यरत असणार्या पोलीस प्रशासनातील कर्मचार्यांना योग्य त्या सूचना दिल्या असून, सोशल डिस्टिन्सिंगबरोबरच इतर नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, कर्तव्य बजावताना अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. श्रीगोंदा येथे दंगल नियंत्रण पथकातील 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. कोरोना वैश्विक महामारीवर आपण लवकरच विजय मिळवू, तसेच संपूर्ण जगही कोरोनाच्या विळख्यातून लवकरच मुक्त होईल, असा विेशास जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांनी व्यक्त केला.पोलीस प्रशासनातील दंगल नियंत्रण पथकातील 16 पुरुष व महिला कर्मचार्यांनी कोरोनावर मात केल्याबद्दल त्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांनी अभिनंदन केले. यावेळी ते बोलत होते. या कर्मचार्यांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस अधीक्षक प्राजक्ता सोनवणे, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सहा. पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी सिंह पोलीस कर्मचार्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.सिंह पुढे म्हणाले की, या पोलीस कर्मचार्यांवर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत. सर्व कोरोना यौद्धे जीवाची बाजी लावून कोरोनापासून नागरिकांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोनापासून मुक्त झालेल्या कर्मचार्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. मास्क म्हणजे खर्या अर्थाने ढालच आहे.छोट्या-मोठ्या प्रत्येक व्यावसायिकाने या ढालीचा म्हणजेच मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.त्याचा वापर प्रत्येकाने करावा. मास्कचा वापर न करणार्यांवर कारवाई केली जात असून,सूचनांचे पालन न करणार्यांवर अधिक कठोर कारवाई करणार आहोत.कोरोनाचे हे संकट आपण एकमेकांच्या सहकार्याने परतवून लावू.त्यासाठी शहराबरोबरच जिल्ह्यातील नागरिकांनी केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या संकट काळात घालून दिलेल्या नियमांचे पालन करायला हवे असे ते म्हणाले.
