
अहमदनगर : जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत ६२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६४.२५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३६७ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१ रुग्ण बाधित
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, संगमनेर ०१, राहाता ०१, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट ०१, नेवासा ०२, शेवगाव ०१ आणि कोपरगांव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २५७ जण बाधित आढळुन आले
अँटीजेन चाचणीत आज २५७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर ३३, राहाता २२, पाथर्डी ४८, नगर ग्रामीण १३, श्रीरामपुर ०६, कॅन्टोन्मेंट २१, नेवासा २१, श्रीगोंदा २१, पारनेर ११, अकोले ०४, राहुरी १०, शेवगाव ०९, कोपरगाव ०४, जामखेड १० आणि कर्जत २४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १८५ रुग्णांची नोंद
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १४७, संगमनेर ०९, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०८, श्रीरामपूर ०३, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०२, अकोले ०२, राहुरी ०५, शेवगाव ०१ आणि कोपरगाव ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
41+257+185=483
दरम्यान, आज एकूण ३८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७२, संगमनेर २३, राहाता ३, पाथर्डी २७, नगर ग्रा.१६, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २१, श्रीगोंदा १८, पारनेर १०, अकोले ४, शेवगाव १४, कोपरगाव ३९, जामखेड ५, मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेले एकूण रुग्ण=६२५०
उपचार सुरू असलेले रूग्ण= ३३६७
मृत्यू: १०६
एकूण रूग्ण संख्या=९७२३
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
