अहमदनगर । (30 July 2020) महापालिका स्थायी समितीतील रिक्त असलेल्या आठ जागांवर नगरसेवकांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिवसेनेकडून शाम नळकांडे, विजय पठारे, भाजपकडून मनोज कोतकर, सोनाबाई शिंदे. राष्ट्रवादीकडून सागर बोरुडे, परवीन कुरेशी, प्रकाश भागानगरे तर काँग्रेसकडून सुप्रिया जाधव यांना संधी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या सभागृहामध्ये दुपारी एक वाजता महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा घेण्यात आली. सभेत गटनेत्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे दिली. ती नावे महापौर वाकळे यांनी सभागृहात जाहीर केली.दरम्यान, लॉकडाऊनच्या अगोदरपासून स्थायी समिती सदस्यांच्या निवडी रखडल्या होत्या. निवडी झाल्याने स्थायी समिती सभापती निवडीच्या हालचालीला वेग येणार आहे.