अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे संपूर्ण तपासाला आता वेगळं वळण लागलं आहे. ‘त्यातच रिया सुशांतला त्रास देत होती’, अशी माहिती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने देखील बिहार पोलिसांनी दिल्याचं ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा साऱ्यांच्या नजरा या प्रकरणाकडे वळल्या आहेत.

मणिकर्णिका या चित्रपटाच्या माध्यमातून अंकिताने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं यावेळी तिला सुशांतने शुभेच्छा देण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला होता. यावेळी बोलत असताना रियामुळे त्याला त्रास होत असल्याचं त्याने अंकिताला सांगितलं होतं. याचा पुरावा म्हणून अंकिताने सुशांतचे मेसेज देखील पोलिसांना दाखवले होते.