
अहमदनगर : दि. ०१ -कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्या साठी मागील अडीच महिन्यांपासून लॉक डाऊन चालू आहे. लॉक डाऊन च्या पहिल्या टप्प्या पासून च गरजूंची भूक भागवण्यासाठी अहमदनगर युवा फौंडेशन चे अध्यक्ष अल्तमश सलीमभाई जरीवाला यांनी अविरतपणे 600 पेक्षा जास्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची किट स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खडतर काळा मध्ये घर पोहोच वाटप केले. याबद्दल टिपू सुलतान सामाजिक युवा प्रतिष्ठान ने त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केला आहे. याप्रसंगी अल्तमश जरीवाला यांनी सांगितले की “अल्लाह ने मला वंचित लोकांची सेवा करण्याची संधी दिली आणि मी फ़क्त माध्यम आहे व माझ्या हातून गरजू बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली याचा खुप मनस्वी आनंद आहे. तसेच पुढील काळातही गरिबांना सर्वतोपरी मदत फौंडेशन तर्फे केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी टिपू सुलतान सामजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाह फैसल सय्यद (शानु), मोहम्मद सहाब,साजिद सय्यद, मुबिन शेख,अन्वर सय्यद,अज्जू शेख, आवेज़ शेख, मोहसीनभाई आदी उपस्थित होते.
