अहमदनगर : (०१/०६/२०२०) झेंडीगेट येथील सुभेदार गल्ली येथे कोविड19 बाधित रुग्ण आढळला होता त्यामुळे कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी येथे हॉटस्पॉट घोषित करून झेंडीगेट सील्ड करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आदेशानुसार २७ मे २०२० पर्यंत या भागास सील्ड करण्यात आले होते. सदरहू कालावधीत कोणताही नवीन कोरोना रुग्ण या भागात आढळला नाही.

झेंडीगेट येथील नालसाब चौक,अशोका हॉटेल ते रामचंद्र खुंट,न्यू इंडिया इन्शुरन्स ऑफिस रस्ता वाहतुकीस सुरु करण्यात यावे आणि येथील पत्रे त्वरित काढण्यात यावेत अशी मागणी आमदार संग्राम जगताप,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शेख जावेद अल्ताफ,अहमदनगर राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस आरिफ पटेल,नगरसेवक समद खान यांच्यासह राष्ट्रवादी शिष्ट मंडळाने अहमदनगरचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केली.

अशोका हॉटेल ते डाळ मंडई झेंडीगेट येथील हा रस्ता मुख्य बाजारपेठेला जोडणारा रस्ता असून येथे मारलेल्या पत्र्यामुळे दळण वळण करण्यास स्थानिक नागरिकांचे हाल होत आहे त्यामुळे लवकरात लवकर हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करावे असे निवेदनात नमूद केले आहे.