Lockdown 10 th day Ahmednagar

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारत देशात लॉक डॉऊन लावण्यात आले आज या लॉक डॉऊनचा 10 वा दिवस.

A.R,SHAIKH

अहमदनगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारत देशात लॉक डॉऊन लावण्यात आले आज या लॉक डॉऊनचा 10 वा दिवस.अहमदनगर शहरातील विविध भागात या लॉकडॉऊनचे पालन अत्यंत काटेकोरपणे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
LOCKDOWN 10 TH DAY AHMEDNAGAR CITY


शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजेच एमजी रोड पासून ते आडते बाजारापर्यंत सराफ बाजार पासून गंज बाजारापर्यंत सर्वत्र शुकशुकाट आणि दुकानांना टाळे पहावयास मिळाले.माळीवाडा,शनी चौक,माणिक चौक,नवीपेठ,सारडागल्ली,रामचंद्रखुंट,झेंडीगेट,स्टेट बँक चौक,जीपीओ रोड,कलेक्टर ऑफीस रोड,घास गल्ली,तेलीखुंट,सर्जेपुरा शहरातील सर्वच प्रमुख भागात लॉक डॉऊनचे
100 टक्के पालन करण्यात येत आहे.

अत्यावश्यक असल्याशिवाय अहमदनगरचे नागरीक बाहेर पडत नाहीय.औषधी आणि भाजीपाला घेण्यासाठीच नागरीक तेही गर्दी टाळून बाहेर आल्याचे दिसले.कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान माजवले आहे.यापासून रक्षणासाठी सध्यातरी कोणतेही औषध उपलब्ध झालेले नाही. संशोधन संपूर्ण जगात सुरु आहे,त्यामुळे सध्या यापासून दूर राहण्यासाठी सोशल डिस्टनसींग शिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय नाही.त्यासाठी घरी रहा सुरक्षीत रहा सोशल डिस्टंसींगचे पालन करा.अत्यंत आवश्यक असले तरच बाहेर या तेही गर्दी टाळून.गर्दीच्या ठिकाणी हा कोरोणा अत्यंत प्रभावी पणे पसरण्याची अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे अहमदनगरकरांनी आणि संपूर्ण भारतवासियांनी कृपया काळजी ठेवा आणि घरातच राहा. ए.आर.शेख कार्य.संपादक दर्शक

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येईल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
सर्व माहित असूनही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश अहमदनगरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले शहरात स्वतः याचा आढावा त्यांनी घेऊन नागरिकांना समजावले. तरीही ज्यांना समजणार नाही त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे