अहमदनगर- सेवानिवृत मुख्याध्यापक उमर उस्मान सय्यद यांचे नुकतेच अल्प्शा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर सिना तिरावरील गंजे शहीदा कब्रस्तान येथे भावपूर्ण आदरांजली देत अंत्यविधी करण्यात आला . 

  मूळचे अहमदनगरचे असलेले सय्यद सर हे सोलापूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले व मुख्याध्यापक पदावर निवृत्त झाले.गणित हा त्यांचा आवडता विषय होता .त्यांचे विद्यार्थी सातत्याने बोर्डात गुणवंत यादीत झळकत असत्.त्यांचे अनेक विदयार्थी आज उच्च पद्स्थ अधिकारी आहेत तर काही निवृत्त ही झाले आहेत . प्राथमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन म्हणून ही त्यांनी यशस्वी कार्य केले. 

  शैक्षणिक,सामजिक सह्कार सह विविध क्षेत्रांत त्यानी उल्लेखनीय  कार्य केले आहे.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  सेवानीवृती चा कार्यकाळ त्यानी अहमदनगर येथे अत्यंत धार्मीक  पद्धतीने कुटुंबीय,आप्त व स्नेहिज् ना सह व्यतित केला .त्यांच्या मागे मुले ,सुना ,नातवंडं असा मोठा परिवार आहे .पत्रकार अ .वहाब सय्यद यांचे ते वडील होत.