अहमदनगर ः कोविडचा काळ हा मनाला वेदना देणारा काळ ठरला या संकट काळ मध्ये आ.संग्राम जगताप यांनी केलेले काम आजच्या युवकांन पुढे प्रेरणादायी आहे. कोरोनाच्या पहिल्या दिवसापासूनच आ. संग्राम जगताप यांचे बूथ हॉस्पिटला सहकार्य लाभले त्यामुळे आज आम्ही कोरोना रुग्णांनाचि सेवा करू शकलो, जेव्हा जेव्हा आम्हाला गरज भासली तेव्हा तेव्हा आ.संग्राम जगताप आमच्यासाठी धावून आले.

मुबंई येथील मयूर टाकळकर, विशाल कोळेकर, रोहन कोळेकर, रोशन कोळेकर, सिद्धेश नाक्ती यांनी आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावनेतून मदतीचा हात दिला. आजच्या युवा पिढीने सामजिक बांधिलकी जोपासावी असे प्रतिपादन बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे यांनी व्यक्त केले.

मुंबई येथील मयूर टाकळकर, विशाल कोळेकर, रोशन कोळेकर, सिद्धेश नाक्ती याच्या वतीने बूथ हॉस्पिटला रुग्णांसाठी विविध दैनंदिन वापरातल्या वस्तू भेट देताना आ.संग्राम जगताप, प्रा.माणिकराव विधाते, भूपेंद्र परदेशी, सचिन जाधव, निलेश लाहुंडे, महेश वालेकर, प्रताप भिंगारदिवे, प्रशांत घोडके, साई बोरुडे, संजय सानप आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मयूर टाकळकर म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, यांच्या कामाचा आदर्श आम्ही घेऊन मुंबई येथून शहरातील बूथ हॉस्पिटला मदत करण्यासाठी आलो आहे. कोरोना संकट काळात समाजासाठी आ.संग्राम जगताप यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्यांचा वाढदिवस आम्ही सामाजिक उपक्रमांनी साजरा केला असे ते म्हणाले.