
मुंबई (दि २ जून २०२१) : “राजकारणात कोणी शत्रू नसतो, ते मित्र आहेत आणि राहतील. काल ते खडसेंच्या घरी गेल्याचं पाहून मला चांगलं वाटलं. त्याआधी ते शरद पवारांच्या घरी गेले. विरोधी पक्ष जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. पण लोकशाहीत संवाद असलाय हवा, महाराष्ट्रात ही परंपरा आहे. त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील तर स्वागत करायचा पाहिजे. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. एकमेकांकडे जात राहिलं पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“देवेंद्र फडणवीस यांना पुढील तीन वर्ष टीकाच करायची आहे. विरोधी पक्षनेत्यांचं कामच आहे सत्ताधारी नेते, मंत्री यांच्यावर टीका करणं. लोकशाहीत ही टीका स्वीकारली पाहिजे. त्यांनी काय टीका केली माहिती नाही, पण त्यांनी करोना संकटात महागाई, वादळ. मदत योजना यासंदर्भात बोललं पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारसोबत काम केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिली आहे.
