अहमदनगर : येथील ऑल इंडिया युथ फेडरेशनचे शहरजिल्हाध्यक्ष फिरोज़ चाँद शेख यांनी नुकतीच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र ब.भोसले यांच्याकडे नागरी आरोग्यविषयक महत्वाची मागणी केलेली आहे.   ते आपल्या मागणी पत्रात म्हणतात कि, अहमदनगर शहरांमध्ये नवीन आजार म्यूकर माइकोसिस (black fungus) चे काही पेशंट आढळून आले आहेत.

त्या पेशंटकरिता ‘अँफोनेक्स’ (AMPHONEX) इंजेक्शनची औषधोपचारासाठी गरज असते. त्याचा फार तुटवडा निर्माण झालेला दिसून येत आहे. मेडिकल मार्केटमध्ये ‘अँफोनेक्स’ (AMPHONEX) इंजेक्शन फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. या रोगाचे पेशंट व उपलब्धता पहाता त्याचाही काळाबाजार होण्याची फार शक्यता दिसून येत आहे.

त्याकरिता आम्ही आपल्याला मागणी करत आहोत की, ‘अँफोनेक्स’ (AMPHONEX) इंजेक्शन आपण जिल्हाधिकारी म्हणून ताब्यात घेऊन आपल्याच कार्यालयामार्फत थेट पेशंट व संबंधित हॉस्पिटलला द्यावेत. जेणेकरून रूग्णांची हेळसांड होणार नाही, काळाबाजार होणार नाही व त्वरीत उपलब्ध होईल.हे सर्व आपल्या नियंत्रणात राहून पेशंटच्या नातेवाईकांना जो त्रास होणार आहे ते कुठेतरी थांबले आणि आपल्यामार्फत योग्य न्याय मिळेल असे ते म्हणाले.