अहमदनगर ( श्रीरामपूर ) दि ११ मे २०२१ – रमजान ईद सनाच्या पार्श्वभुमिवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे शहरातील मुस्लींम बांधवाची बैठक घेण्यात आली.कोरोना माहामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी देखील सर्व मुस्लीम बांधवानी ईदच्या दिवशी घरी राहुनच ईदची नमाज अदा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे झालेली बैठक मध्ये संदिप मिटके DySP श्रीरामपुर यांनी  मुस्लीम बांधवांना ईदच्या सुभेच्छा देत यावर्षी ही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने सर्व समाज बंधवांच्या हिताच्य दृष्टीने घरात बसुनच ईदची नमाज अदा करावी अशी विनंतीसह अवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले.

   सदर झालेल्या बैठकीत मुस्लीम समाजाचे नगरसेवक,मुज्जफर शेख,मुक्तार शहा,कलिम कुरेशी,जेष्ठ कार्यकर्ते अहमदभाई जहांगिरदार,जामा मस्जिदचे ट्रस्टी शकुर ताज मोहंमद, सादीद मिर्जा, एजाज दारुवाला,रज्जाक पठाण,ॲड समिन बागवान,शहर काझी सय्यद अली,नजीर मुलानी,रियाज खान व इतर प्रतिष्ठीत नागरीक मिटींगवर उपस्थित होते.

दरम्यान उपस्थितांनी रमजान ईद सनाचे अनुषंगाने उपवास करीता लागणारे फ्रुट चे हातगाडी सायंकाळी सुरु ठेवावी,किंव फ्रुट विक्री करणारे फिरते सुरु ठेवण्याबाबत सुचना केला.

त्यांनी केलेल्या सुचना समजुन घेवुन मिटींग दरम्यान कोरोनाचा मोठया प्रमाणात असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता ईदच्या दिवशी घरीच नमाज अदा करुन ईदचा सन सर्व मुस्लींम बांधवांनी साजरा करावा.शासनाचे नियमांचे सर्वांनी पालन करावे आपल्याकडुन शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे अवाहन केले.