
अहमदनगर (१० मे २०२१) : केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने येत्या 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाला कोवीड लसीकरण करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाची अंमलबजावणी करतांना १२ बलुतेदार कष्टकरी,कारखान्यात श्रम करून आपली उपजीविका करणारा श्रमिक वर्ग , घर काम करणारे, भाजीवाले फळवाले, कचरा गाडी वाहून नेणारे सफाई कामगार ,दवाखान्यात काम करणारे वॉर्ड बॉय, मावशी, इतर कर्मचारी, या सर्वांना प्राधान्यक्रमाने लस देण्याची विनंती १२ बलुतेदार महासंघ करीत आहे त्यासाठी आवश्यकता भासल्यास महासंघातर्फे मनुष्यबळ म्हणून स्वयंसेवक देण्यात येतील जेणेकरून प्रशासनाला मदत होईल व सर्वांना न्याय मिळेल आणि कामगार वर्ग लसीकरणापासून वंचित राहणार नाही महासंघाच्या या विनंतीचा प्रशासनातर्फे सकारात्मक विचार होऊन आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी अनुरिता झगडे बारा बलुतेदार महासंघ महिला शहर जिल्हा अध्यक्ष व अनिल इवळे यांनी केली आहे.
