*नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये*

*जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन*

अहमदनगर : कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रुग्णांसाठी आवश्यक मेडीकल ऑक्सीजनच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. राज्य शासनाने अहमदनगर जिल्हयासाठी दैनंदीन 50 मे.टन कोटा ठरवून दिलेला आहे.त्यानुसार दिनांक 27/04/2021 रोजी अहमदनगर जिल्हयासाठी एअर लिक्वीड- 27 मे.टन, लिंन्डे- 19 मे.टन व टी.एन.एस- 3.5 मे.टन असे मिळून एकुण 49.5 मे.टन लिक्वीडऑक्सीजन प्राप्त झालेला आहे. आज दिनांक 28 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हयास 50 मे.टन लिक्वीड ऑक्सीजनचा पुरवठा होणे अपेक्षीत आहे. तरी, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे