
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हाफकिन संस्थेला लस उत्पादन करण्याची मान्यता द्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली होती. केंद्र सरकारतर्फे आता हाफकिनला लस उत्पादनाची मान्यता देण्यात आलीय. त्यानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचे ट्वीटरवरुन आभार मानले आहेत. 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण या संकटावर सहज मात करू हे नक्की असंही ते पुढे म्हणाले.
