
श्रीरामपूर (दि १२ एप्रिल २०२१) प्रतिनिधी : बैतुशिफा हाँस्पिटल चे डॉ.सलिम हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मेडिकल प्रोफेशनल प्रॅक्टिस मध्ये मोठे नाव लौकिक आहे. क्लिनिकल प्रॅक्टिस क्षेत्रात रोगाचे अचुक निदान आणि योग्य उपचार पद्धती वापरून मेडिकल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. प्रत्येक डाँक्टरां मध्ये एखाद्या उपचार पद्धती विषयी नैपुण्य आसते, त्या प्रमाणे डाँ. सलिम यांनी “खतना”(सुंन्ता) या शल्य चिकित्सा पद्धती मध्ये विषेश प्राविण्य मिळविले आहे. “खतना” साठी त्यांच्या कडे राज्य भरातुन लोकं येतात.
आपले क्लिनीक संभाळून इतर सामाजिक कार्यात देखील सहभाग घेतात. आरोग्य विषयक विविध शिबिराचे आयोजन करतात. नव नवीन सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर आसतात. श्रीरामपूर येथे रामनवमी सय्यद बाबा उरूस, ऊत्सव काळात जो मुशायरा आयोजित केला जातो त्याचे ते सुरुवातीच्या मुख्य आयोजन समितीचे सदस्य आहे.व्यायामाची आवड आहे.
सकाळी माँर्निग वाँक करणार्या ग्रुप चे सदस्य आहे. तसेच इतिहासाची आवड आहे. त्यामुळे गडकिल्यांना भेटी देणं,उंच डोंगरावर चढने ,म्हणजेच गिर्यारोहक चा छंद जोपासतात. त्यामुळे ते’ “भटकंती ट्रेकर्स ग्रुप “चे देखील पुर्ण वेळ सदस्य आहे.साहित्यिक क्षेत्रात देखील भरीव योगदान आहे. विविध वृत्तपत्रात आरोग्य विषयक लेख लिहितात.रमजान महिन्यांत तर इस्लाम धर्माचा संपूर्ण मानव कल्याणासाठी काय योगदान आहे.याची संपूर्ण महिनाभर वृत्तपत्रातून त्यांनी लिहिलेली मालिकाच प्रसिद्ध होत असते.
अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणार्या व्यक्तींची श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्ष पदी निवड झाली असून, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!डॉ. सलिम भावी कार्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा!सध्याचा काळ डॉक्टरांसाठी खूप आव्हानात्मक आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन ,कोविड सारख्या भयंकर महामारीचा सामना करण्यासाठी आपल्या सारखे जनरल प्रॅक्टिस करणार्या डाँक्टरांनी आता सज्ज व्हावे लागेल. कोविड च्या उपचारासाठी मोठी हाँस्पिटल लाखो रुपये बिल घेत आहे.
गोर गरिब लोकांकडे एवढे पैसे नाहीत. तुमच्या कडे नेहमी उपचार करण्यासाठी येणारे माणसं देखील एका आशेने पाहत आहे. कृपया आपल्या असोसिएशनला आव्हान करतो की, आपण सर्वांनी कोविड रुग्णांवर माफक दरात उपचार करावे. मानवा वर आणि देशावर आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी आपले अनमोल योगदान द्यावे.हि नम्र विनंती.
