अहमदनगर : केंद्र सरकारकडून शहर विकासाच्या प्रश्नासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप नेहमीच कटीबध्द भाजपा नेहमीच कटीबध्द आहे. विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन करता येत असतो. सर्वांना बरोबर घेवून काम केल्यामुळे एकमेकांमध्ये आपुलकी निर्माण होते. प्रभागातील विकासाचे कामे मार्गी लावून प्रभाग हा समस्यामुक्त करणार आहे.विकास कामामध्ये मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे व प्रभागातील नगरसेवकांचे सहकार्य लाभत आहे. प्रोफेसर कॉलनी परिसरातील चैतन्य अपार्टमेंट अलोक अपार्टमेंट आरती अपार्टमेंट मधील नागरिकांना गेल्या 10 वषापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

तांत्रिक अडचणीमुळे या भागातील नागरिकांना मनपाच्या माध्यमातून पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता तो मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून या भागातील पाणी प्रश्न मार्गी लावला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांनी केले.प्रभाग क्र. 5 मधील प्रोफेसर चौक परिसरातील चैतन्य अपार्टमेंट ,अलोक अपार्टमेंट, आरती अपार्टमेंट मधील नागरिकांचा पाणी प्रश्न भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांनी मार्गी लावल्याबद्दल रहिवाशांच्या वतीने त्यांचा सत्कार करताना चंद्रकांत गुरसाळ, गोविंद् कुलकर्णी, अवधूत कुक्कडवाल, मंदार भोंग, श्रीपाद भोंग, पराग दिक्षीत, चैतन्य जोशी, विजय लोढे, प्रताप जगदाळे, रजनी जोशी, शुभांगी दिक्षीत, श्रीमती शालीनी भोंग, श्रीमती निलीमा लोंढे, आदी नागरिक उपस्थित होते.

श्रीमती रजनी जोशी म्हणाल्या की, गेल्या 10 वर्षा पासून आमच्या अपार्टमेंटचा पाणी प्रश्न गंभीर असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. आम्ही सर्व नागरिक बोअरवेलचे पाणी पित असल्यामुळे अनेकांना पोटाचे आजार निर्माण झाले. पाणी हा बायकांचा महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून आमचा जिव्हाळयाचा पाणी प्रश्न मार्गी लावला याबद्दल आम्ही सर्वांचे वतीने त्यांचे आभार मानतो.