अहमदनगर ( प्रतिनिधी ) : अमृत योजने अंतर्गत भुयारी गटर योजनेचे काम माझ्या प्रभागात क्र. 11 मध्‍ये सुरू असून सर्व रस्‍त्‍यांचे खोदकाम झाल्‍यामुळे रस्‍त्‍याची दयनिय अवस्‍था झाली आहे. मनपाच्‍या दुर्लक्षामुळे व ठेकेदाराच्‍या मुजूरपणामुळे रस्‍त्‍याचे पॅचिंगही केलें नाही याचबरोबर भुयारी गटर योजनेच्‍या खोदकामामुळे नागरिकांच्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नळ तुटले आहेत. ठेकेदाराने तुटलेले नळ कनेक्‍शन न जोडल्‍यामुळे नागरिकांना पाण्‍यावाचून वंचित रहावे लागत आहे. याचबरोबर ड्रेनेजचे कनेक्‍शनही जोडले गेले नसल्‍यामुळे नागरिकांना अनेक समस्‍येला सामोरे जावे लागत आहे. काही महत्‍वाच्‍या बाबी आपल्‍या निदर्शनास आणून देत आहे.

1)      रामचंद्र खुंट ते करशेटजी रोड,  व हातमपूरा रोड हे प्रभागातील महत्‍वाचे व रहदारीचे रस्‍ते आहेत. सदर ठिकाणी भुयारी गटर योजनेचे काम प्रगतीपथावर असून प्रापर्टी कनेक्‍शनचे काम व्‍यवस्‍थित होत नाही. तसेच काम करत असताना पिण्‍याच्‍या पाण्‍याची पाईप लाईन तुटत आहेत त्‍या तातडीने जोडल्‍या जात नाहीत.

2)      सदरील ठिकाणी भुयारी गटर योजनेचे काम झाले त्‍या ठिकाणी रस्‍ते पॅचिंगचे काम योग्‍य पध्‍दतीने व स्‍पेसिफिकेशन प्रमाणे होत नाही ते काम परत योग्‍य पध्‍दतीने व्‍हावे.

3)      करशेटजी रोड वर फक्‍त बीबीएम केलेंडर आहे. तेथे डब्‍ल्‍यू बी एम चा थर टाकला नाही.

4)      प्रभागात ज्‍या ठिकाणी भुयारी गटर योजनेचे काम झाले आहे त्‍या ठिकाणी पिण्‍याच्‍या पाण्‍याची लाईन तुटली असल्‍यास तातडीने जोडणे तसेच रस्‍ता चांगला दर्जाचा पॅचिंग करून देणे आवश्‍यक आहे.

      जो पर्यत सदरचे काम समाधानपूर्वक सुधारणा होत नाही तो पर्यत संबंधीत ठेकेदार याना सदर कामाचे देयके देण्‍यात येवू नयेत. प्रभागात सुरू असलेल्‍या कामाचे ठेकेदार यांचेसह पीएमसी अधिकारी, मनपा अधिकारी यांनी एकत्रित पाहणी करावी. सदर कामामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सदर बाबत योग्‍य ती कार्यवाही तातडीने व लवकरात लवकर करावी अन्‍यथा “बोंबाबोंब” आंदोलन सारखा मार्ग अवलंबवावा लागेल याची नोंद घ्‍यावी. अशी मागणी मा.आयुक्‍त श्री.शंकर गोरे यांच्‍याकडे करताना नगरसेविका कुरेशी परवीन आबीद,भा कुरेशी समवेत विरोधीपक्ष नेता संपत बारस्‍कर, नगरसेवक समद खान, नगरसेवक सुलतान आसिफ शेख आदी उपस्थित होते.