अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांनी स्त्रीयांचा नेहमीच आदर केला. शत्रूच्या स्त्रीयांना मान-सन्मान करुन पाठविणारे शिवाजी महाराज त्याकाळातील आदर्श राज्यकर्ते होते. हा त्यांचा मोठेपणा त्यावेळेच्या सत्ताधिशांनीही मान्य केला. मराठी साम्राज्याचे संस्थापन उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविला, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले.

माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अश्वारुढ पुतळा उभारुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, विजय पठारे, योगिराज गाडे, दत्ता जाधव, संतोष गेनाप्पा, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, शहराध्यक्षा अरुणा गोयल आदि उपस्थित होते.