
अहमदनगर : डांबरीकरण व सुशोभीकरणाची कामे करताना अगोदर ड्रेनेजलाईन व जलवाहिनीची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. खोदाई करावी लागणारी कामे पूर्ण झाल्यावरच रस्त्याची कामे करावीत, असे आदेश आपण प्रशासनाला दिले आहेत. शहरासाठीची अमृत योजना व फेज-2 योजनेची कामे शहरात सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहराची ड्रेनेजलाईन व पाण्याची समस्या दूर होईल. त्यानंतर शहराला नवे रूप मिळेल. अहमदनगर शहर कात टाकत असून, येत्या काही दिवसांत तुम्हाला बदल झालेले शहर दिसून येईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकासनिधीतून व नगरसेवक नज्जू पहिलवान यांच्या प्रयत्नातून मनपा प्रभाग 11 मधील अशोका हॉटेल ते रामचंद्र खुंट रस्ता डांबरीकरण व पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. जगताप बोलत होते. याप्रसंगी स्थायीचे सभापती अविनाश घुले, नगरसेविका रूपाली पारगे, नगरसेवक सागर बोरुडे, मुजाहिद कुरेशी, वाजीद जहागीरदार, मन्सूर शेख, रियाजभाई, साहेबान जहागीरदार, इम्रान जहागीरदार, फकिर मामू, शकील हाजी चमडेवाले, राजू धुप्पड, संजय चोपडा, सय्यद एजाज, कासमभाई, अखलाख जहागीरदार, जहीर शेख, शाहनवाज शेख, मौलाना सईद काझी, मुन्नाशेठ चमडेवाले, जावेद सिमला, सलीमभाई, फिरोजभाई, तन्वीरभाई अड्डेवाले, असलाम हाजी,अमित खामकर,नवेद सिमला,जुनेद सिमला, बाबभाई कुरेशी, अन्सार मेजर, याकुब मास्टर, हारुण कुरेशी,रबनवाज जहागिरदार, मुन्नाभाई आदी उपस्थित होते.








