अहमदनगर : शहरासह उपनगरांतील बहुतांश पथदिवे बंद स्थितीत आहेत. येत्या तीन-चार महिन्यांमध्ये 100 टक्के पथदिव्यांची दुरुस्ती करुन शहर उजळणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी दिली. स्थायी  सभागृह येथे विदयुत विभागाची, शहरातील पथदिव्यांबाबत आढावा बैठक सभापती अविनाश घुले यांनी  घेतली. सदर बैठकीस नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक निखील वारे नगरसेवक सचिन जाधव, उपायुक्त यशवंत डांगे, विद्युत विभाग प्रमुख राजेंद्र मेहेत्रे, विदयुत विभागातील अधिकारी व वायरमन उपरस्थित होते. 

विदयुत विभागाच्या आढावा बैठकीमध्ये सदयस्थिती मध्ये पथदिव्यांच्या फार मोठया प्रमाणात तक्रारी आहेत. ब-याच भागातील पथदिवे बंद असल्याने सर्व नगरसेवक व पदाधिका-यांना नागरीकांच्या रोषास समोरे जावे लागत आहे. बरेच नगरसेवक महानगरपालिकेमध्ये विद्युत साहित्य शिल्लक नसल्याने स्वत।चे पैसे खर्च करून प्रभागामध्ये विदयुत साहित्य बसविल्याच्या अनेक वेळा सभेमध्ये सांगतात. स्मार्ट एलईडी प्रकल्प खाजगी संस्थे मार्फत राबविण्यात येणार असून या प्रकल्पा मुळे महानगरपालिकेचा मोठा आर्थिक फयदा होणार आहे.

सध्या आपल्याला दर महिन्याला सरासरी 38 लाख बील येते. सदर 38 लाख रूपये आपण ठेकेदार संस्थेला देणार असून लाईट बील भरण्याची जबाबदारी ठेकेदार संस्थेवर असणार आहेत. तसेच शहरामध्ये एलईडी लाईट बसविण्याची ते मेंन्टेन ठेवण्याची जबाबदारी ठेकेदार संस्थेकडे असेल. ठेकेदार संस्था 50 ते 55 टक्के वीज बचत करणार आहे. महानगरपालिकेस प्रत्येक वर्षी विद्युत साहित्य खरेदी करता येणारा 1 कोटी रूपयांचा खर्च वाचणार आहे. सदरचा प्रस्तव अंती टप्पयात असून तो लवकरच स्थायी समितीच्या निर्णयास्तव ठेवण्यात येणार असल्याची माहिती विदयुत विभाग प्रमुख यांनी दिली. 

ठेकेदार संस्थेचे गांधी म्हणाले की, सद्यस्थितीत 35 हजार दिवे असून हे सर्व दिवे काढण्यात येणार आहे. त्यांच्या जागेवर सर्व प्रभागामध्ये टप्या-टप्याने एलईडी दिवे बसविण्यात येणार आहे. हे सर्व काम येत्या तीन ते चार महिन्यामध्ये पुर्ण होणार आहे. काम पुर्ण झाल्यानंतर एखाद्या भागातील पथदिवा बंद पडल्यास, ठेकेदार संस्थेस याची माहिती त्यांच्या कडील सॉप्टवेअर मार्फत समजणार आहे.कर्मचाऱ्यांबाबत तक्रार आल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचे सभापती घुले यांनी सांगितले.