
अहमदनगर- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीत निधन झाले. मंगळवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, त्यांना श्वास घेण्यास जास्त त्रास होत असल्याने मंगळवारी दुपारपासूनच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते सत्तर वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
