अहमदनगर : सभागृह नेते मनोज दुलम हे विकास कामा बरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे नगरसेवक आहेत. त्यांनी वर्षभर कोरोना संसर्गाच्या काळामध्ये कोविड रूग्णांना आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांच्यावर उपचारासाठी प्रयत्नशील राहिले. त्याच बरोबर रूग्णांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. नातेवाईक पेशंट जवळ जात नव्हते पण मनोज दुलम यांनी अहोरात्र सेवा दिली. त्यांच्या प्रयत्नातूनच लवकर श्रमिक नगर मध्ये आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याच बरोबर बालाजी मांदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी सुमारे 40 लाख रूपयाचा निधी मंजूर असून लवकरच हे कामही सुरू होणार असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

सभागृह नेते मनोज दुलम यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. 5 ध्ये श्रमिक नगर येथे रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी सभागृह नेते मनोज दुलम, नगरसेवक महेंद्रभैय्या गंधे, माजी नगरसेवक तायगा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते उदय कराळे, सावेडी भाजप मंडल अध्यक्ष सतिष शिंदे, शिवराम श्रीगादी, जालिंदर गुरप, राजू येमूल, आसाराम मोकाटे, प्रिती दळवी, निलीमा दुर्गम, वनमाला टोलपे, राधाबाई गादी, वैशाली कटक, मंदाबाई गायकवाड, भाग्यलक्ष्मी गड्डम, आदी उपस्थित होते.

भाजपा शहरजिल्हाध्यक्ष महेंद्रभैय्या गंधे म्हणाले की, श्रमिक नगर मधील जनता नेहमीच भाजपा पक्षाबरोबर प्रामाणिकपणे राहिली आहे. या भागाचा विकास व्हावा यासाठी मनोज दुलम नेहमीच प्रयत्नशील असतात. यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. श्रमिक नगर मधील विकासाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आम्ही चारही नगरसेवक कटीबध्द आहोत असे ते म्हणाले.

सभागृह नेते मनोज दुलम म्हणाले की, श्रमिक नगर मध्ये आरोग्य केंद्र उभारावे यासाठी पाठपुरावा असून लवकर हे काम मंजूर होईल त्यामुळे या परिसरातील सर्व सामान्य नागरिकांना अल्प दरात रूग्ण सेवा मिळेल. बालाजी मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 40 लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामधून विविध विकास कामे केली जाणार आहे. प्रभागातील मुलभूत प्रश्‍ना बरोबरच विकासाचे प्रश्‍न मार्गी लागत असून कुष्ठधाम रोडचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. सावेडी उपनगराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या विकास कामामुळे शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल असे ते म्हणाले.