मुंबई – इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे पुन्हा एकदा विषयनिहाय तासिकांचे डीडी सह्याद्री वाहिनीवर आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात ट्विट करून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. या तासिका 15 मार्चपासून सुरू होणार आहेत.
इयत्ता दहावीच्या तासिकांचे वेळापत्रक –
सोमवार – 12:30 ते 1:00
मंगळवार ते शुक्रवार – 12:30 ते 1:00 आणि 1:30 ते 2:00
इयत्ता बारावीच्या तासिकांचे वेळापत्रक –
सोमवार ते शुक्रवार – 2:30 ते 3:30
इयत्ता निहाय व विषय निहाय दैनंदिन वेळापत्रक http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे बोर्डाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे.