
अहमदनगर : भाजप-राष्ट्रवादी युतीची सत्ता असलेल्या अहमदनगर महानगरपालिकेत ज्या प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्या प्रभागात जाणून बुजून कामे करण्यास टाळाटाळ करण्यात येते आणि नागरी सोयी सुविधा याठिकाणी देण्यातही नेहमी राजकारण आणून विकासाला या युतीद्वारे म्हणजेच राष्ट्रवादी आणि भाजप युती द्वारे नेहमी खोळंबा घातला जात आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकास पाणी प्रश्नासाठी अहमदनगर महानगर पालिकेत आमरण उपोषण करावे लागत आहे यापेक्षा दुर्दैव ते काय म्हणावे लागेल ज्या महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सोबत महाविकास आघाडी राज्य सरकार चालवीत आहे त्या ठिकाणी एका शिवसेनेच्या नगरसेवकाला पाणी प्रश्नासाठी अहमदनगर महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादीच्या खुल्या युतीमुळे उपोषण करावे लागत आहे.
वारंवार मागणी करुनही कल्याण रोड परिसरातील पाणी प्रश्न सुटत नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी परिसरातील पाणी प्रश्न सोडविण्यात यावा या मागणीसाठी महापालिकेत आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा नगरसेवक शिंदे यांनी दिला आहे. कल्याणरोड परिसराचा विस्तार मोठ्या झपाट्याने होत असून नागरी लोकवस्ती वाढत आहे. परंतु गेल्या पंधरा वर्षापासून या भागाचा पाणी प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. या भागातील नागरिकांना पाणी समस्याला वारंवार तोंड द्यावे लागत आहे.
महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही पाणी प्रश्न सुटलेला नाही. विविध आंदोलने, रस्ता रोको, पालिकेत नागरिकांसह पालिका प्रशासनाबरोबर पाणी प्रश्नाबाबत हजोरोवेळा चर्चा झाली. तरीसुद्धा पाणी प्रश्न सुटलेला नाही. कल्याणरोड परिसरातील गणेशनगर येथे दहा वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधून तयार आहे. परंतु या टाकीमध्ये आजपर्यंत पाणी आले नाही. त्यामुळे या भागामध्ये तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई आहे. तरी महापालिकेने गणेशनगर भागातील टाकीमध्ये पाणी पुरवठा करून सर्वभागाला पूर्णक्षमतेने पाणी द्यावे. जोपर्यंत सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही.
अनेकवेळा महापालिकेने पत्रव्यवहार करून दिलेले आश्वासने पूर्ण केली नाही. त्यामुळे पालिकेवरचा आमचा विश्वास उडाला आहे. पालिका संपूर्ण शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करते व कल्याण रोड भागालाच दहा बारा दिवसांनीच पाणी पुरवठा का केला जातो. या भागातील नागरिक 100 टक्के महापालिकेचा कर भरला जातो. तरीसुद्धा कल्याण रोड भागावर पाणी प्रश्नाबाबत अन्याय का केला जातो? बुधवारपासून महापालिकेमध्ये आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिली.
