आता रोजच इंधन दरवाढ होत आहे पेट्रोल महाग होत आहे डिझेल दर वाढत आहे आणि या महाग दरवाढीचा कोणालाही काही फरक पडत नाही असं सरकारने ठाम समजलेल आहे कारण जनसामान्य काय करणार थोडी वाढ केली कि काही जागरूक सामाजिक संस्था आणि काही विरोधी पक्ष मिळून सरकार विरोधी पाट्या घेऊन आणि इंधन दरवाढी विरोधात रस्त्यावर येऊन हाय हाय करणार बसस मग काय तर घरी गॅस वापरावे लागणार आहेच ना गाडीत पेट्रोल टाकावे लागणार आहेच ना आणि डिझेल त्याच काय जाऊद्या कि हो. हा जास्तच जनता जागरूक होत असेल आणि इंधन दरवाढीला विरोध करण्यास देशभर रस्त्यावर उतरत असेल तर ठीक आहे सरकार म्हणून आपण ५ रुपये गॅस वर कमी करू आणि पेट्रोल वर ३ रुपये कमी करू कारण काय तर आमची जनता किती भोळी आहे हे तुम्हाला थोडी ठाऊक आम्ही पहिलेच पेट्रोल १०० वर घेऊन गेलो आता दोन पाच रुपये कमी केल्यानं आमचं काहीच जात नाही आणि जनतेलाही दरवाढ कमी झाल्याचा आनंद होतो बस का केले गॅसचेही ३ रुपये कमी आणि पेट्रोलचेही ४ रुपये कमी आता सरकारचा उदोउदो करण्यास तुम्ही तयार व्हा असं लवकरच आपणास पहावयास मिळेल तर यात चकीत होऊन जाऊ नये हो पण हे दोन चार रुपये कमी होण्यासाठीही तुम्हाला देशभर रस्तयावर उतरावे लागेल का नाही तर तुम्ही म्हणाल आज ना उद्या होईल कमी तर तस शक्य नाही.

नवी दिल्लीः पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ गुरुवारी केंद्र सरकारने सर्व श्रेणींमधील एलपीजी सिलेंडरचे दर २५ रुपयांनी वाढवले.सरकारचा हा निर्णय अनुदानित व विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या गॅस सिलेंडर ग्राहकांना लागू असल्याने या लाखो ग्राहकांना ही दरवाढ सोसावी लागणार आहे. या दरवाढीत उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणार्या स्वयंपाक गॅस सिलेंडरचाही समावेश आहे.या महिन्यातली गॅस सिलेंडरमधील ही तिसरी दरवाढ आहे. या अगोदर ४ फेब्रुवारीला २५ रु.ची दरवाढ झाली होती नंतर १५ फेब्रुवारीला ५० रु.ची दरवाढ करण्यात आली होती. गेल्या डिसेंबरपासून ही दरवाढ होत असून ती आतापर्यंत १५० रु.नी वाढली आहे.या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये स्वयंपाकाचा १४.२ किलो ग्रॅम गॅस सिलेंडरचा दर ७६९ रु.वरून ७९४ रु. इतका झाला आहे.दरम्यान २५ रु.च्या दरवाढीवरून काँग्रेसने मोदी सरकार हे जनतेच्याविरोधात असल्याचा आरोप केला आहे. सरकारने या दरवाढीतून सामान्य गरीब कुटुंबानाही सोडले नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.