पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.चित्रा वाघ पत्रकार परिषदेत म्हणाल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील कारवाईत ढील का, अशी विचारणा केली असता, कारवाई करण्याबाबत लेखी आदेश आला नाही, लेखी आदेश आला नाही, तिच्या आई-वडिलांची तक्रार नाही, असे पोलिस सांगतात. पोलिस आदेशाची वाट पाहत आहेत का ? १७ दिवसांनंतरही गुन्हा दाखल करून का घेतलेला नाही? माझ्या २० वर्षांच्या सामाजिक काळात असे पोलिस अधिकारी बघितले नाहीत, असे म्हणत त्यांनी पोलिसांवर निशाणा साधला. चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलत होत्या पूजासोबत राहणाऱ्या दोन तरुणांची चौकशी का केली नाही. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना पोलिसांनी का सोडून दिलं. प्रसिध्दीमाध्यमांमधील माहितीनुसार, आता ते दोघे फरार आहेत. त्यांच्या घराला टाळे आहे. या प्रकरणात दोघांची कस्टडी पोलिसांनी का घेतली नाही. पोलिसांनी ठरवलं आहे का, हातावर हात धरून गप्प का? वानवडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पीआय कशा पध्दतीने बोलले, असा पोलिस अधिकारी मी आतापर्यंत पाहिला नाही,असे सांगत चित्रा वाघ यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले. अधिवेशनात आम्ही या प्रकरणावर प्रश्न विचारणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दुपारी १ वाजता पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राठोड यांची चौकशी न करता अहवाल कसा बनवला?, अरुण राठोडच्या क्रमांकाचा सीडीआर पोलिसांनी का तपासला नाही? अरुण राठोडच्या फोनवरून झालेल्या ॲक्टिव्हीची माहिती पुणे पोलिसांना नाही. घटनाक्रमाबाबत पोलिस स्पष्ट माहिती देत नाहीत, अशीही टीका त्यांनी केली. पुणे कंट्रोल रूमला प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती पोलिसांनी सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली.कुणाला वाचवलं जातेय, कुणाला वाचवायचे आदेश आहेत. सगळे पुरावे असतानाही पोलिस काहीच करत नाहीत. संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्यानंतरही संजय राठोडांनी कोरोना पसरवण्याचं काम केलं, असे त्या म्हणाल्या. पूजा चव्हाणचा पुण्यातील फ्लॅट सील, चित्रा वाघ यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी दरम्यान, चित्रा वाघ यांनी पुण्यातील वानवडीतील महम्मदवाडीच्या हेवन पार्क सोसायटीतील पूजा चव्हाण हिच्या फ्लॅट परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्या वानवडी पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिस गप्प का, असा प्रश्न उपस्थित करत त्या आक्रमक झाल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.