अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजपाचे माजी खा. दिलीप गांधी यांनी एसटी स्टँड येथील अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, शरद ठुबे, अभिषेक दायमा, बाळासाहेब पोटघन, दादासाहेब मोटे, मल्हारी दराडे, नाना जेवरे आदी उपस्थित होते. माजी खा. गांधी म्हणाले की, छत्रपतींचा आदर्श हा समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजप्रबोधन करावे. जात-धर्म व पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन समता व बंधुत्व प्रस्थापित केली. रयतेला केंद्रबिंदू मानून त्यांनी आपला राज्यकारभार केला. छत्रपतींची कामे समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्याचा उजाळा आपण सर्वांनी देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.