अहमदनगर (दि १० फेब्रुवारी २०२१) ( राजेश सटाणकर ) : श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.कविता दत्तू चंदन व उपसरपंचपदी धनंजय लाकूडझोडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.  सौ.चंदन या कोल्हाटी समाजाच्या पहिल्या सरपंच ठरल्या आहेत.राज्यात ही घटना प्रथमच घडली असून बदलत्या समाजात आज ज्यांना मतदान माहीत नव्हते ते आज आरक्षणमुळे  सरपंच,सभापती,नगराध्यक्ष, महापौर अशा पदांवर विविध उपेक्षित समाजाला न्याय मिळाला आहे. बदलत्या समाजाचे हे प्रतिबिंब असून नवनिर्वाचित सरपंच  सौ. चंदन आणि सर्व ग्रा.पं सदस्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ग्रामिण भागाचा विकास  ” खेड्याकडे चला ….” या म.गाधींच्या संकल्पनेतून व्हावा..त्यादृष्टीने ग्रामिण संघटन आवश्यक आहे .अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.