अहमदनगर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोफत शिवभोजन थाळीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या शुभहस्ते रेल्वे स्टेशन समोरील श्री दत्त हॉटेल शिवभोजन थाळी केंद्र या ठिकाणी झाला.

ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहरातील श्री दत्त हॉटेल शिवभोजन केंद्रावरील येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसासाठी मोफत भोजन दिले जात आहे. यासाठी केंद्राचे संचालक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ताशेठ गायकवाड यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काळे यांनी काढले आहेत. 

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, केंद्राचे संचालक दत्ताशेठ गायकवाड, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलिल सय्यद, निजामभाई जहागीरदार, अनंतराव गारदे, आयिंदी शहा, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, अनिसभाई चुडीवाल, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील,सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, सहसचिव नीता बर्वे, खजिनदार मोहनराव वाखुरे, महिला सेवादल शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, अनिसभाई चुडीवाला, निसार बागवान, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सहसचिव गणेश आपरे, शरीफ सय्यद, इम्रान बागवान, अजय मिसाळ, संजय भिंगारदिवे, श्यामवेल तिजोरे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते