
अहमदनगर : महापालिकेसाठी केलेल्या कामाची थकीत देयके मिळावीत म्हणून लहान ठेकेदार करत असलेल्या उपोषणकर्त्यांचा आज उपोषणाचा तब्बल चौथा दिवस असून दिनांक २५ जानेवारीपासून हे ठेकेदार महापालिकेने थकवलेले देयके मिळावीत म्हणून महापालिका कार्यालयासमोर औरंगाबाद रोड इथे उपोषण करत आहेत .यातील काही जणांची प्रकृती खालावल्याने निदर्शनास आले असून काही बोलण्याची देखील ताकद उपोषणकर्त्यामध्ये राहिलेली नाही, मात्र तरीदेखील सुस्तावलेल्या महापालिकेला जाग आलेली नसून अद्याप देखील या उपोषणकर्त्यांपैकी कुणालाही केलेल्या कामाचा एक छदाम देखील महापालिकेने दिलेला नाही. अशा परिस्थितीत एखाद्या आंदोलकांच्या जीवाचे बरेवाईट झाले तर जबाबदारी कोणाची ? याचे उत्तर आता महापालिकेला आणि प्रशासनाला द्यावे लागणार आहे.महापालिकेत अनेक वर्षापासून थकीत असलेल्या छोट्या कामांच्या बिलांची देयके मिळत नसल्याने छोट्या ठेकेदारांनी महापालिकेसमोर 25 तारखेपासूनच महापालिका कार्यालयाबाहेर उपोषणास सुरुवात केली आहे . जनआधार सामाजिक संघटनेने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला असून २६ जानेवारी रोजी या ठेकेदारांची शिवसेना नेते बाळासाहेब बोराटे व अभिषेक कळमकर यांनी भेट घेतली होती.अनेक कामे अत्यावश्यक परिस्थितीत स्थानिक अडचण निवारण करण्यासाठी ठेकेदारांकडून करून घेण्यात आलेले आहेत, अशी कामे करणारे ठेकेदार हे देखील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.
त्यातच 2020 मध्ये कोरोना संकटाने सदर ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती भयानक खालावलेली आहे. ठेकेदारांना उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत राहिलेले नाहीत. मुलांच्या शाळेची फी, कर्जांचे देणे, दैनंदिन गरजा व इतर खर्च सुरूच आहेत त्यामुळे ठेकेदार यांची आर्थिक व मानसिक परिस्थिती बिघडत चालली आहे.चालू वर्षी अहमदनगर महापालिकेची कर वसुली ही 50 कोटींच्या पुढे झालेली आहे. हा एक उच्चांक आहे. ‘ कर वसुली झाली की देयके देऊ ‘ असे आश्वासन महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते मात्र दरवर्षी पैसे महापालिकेच्या इतर खर्चापोटी खर्च घेऊन छोट्या ठेकेदारांचे देणे देण्यास महापालिका टाळाटाळ करत असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. डिसेंबर 2020 मध्ये आयुक्तांना निवेदन देऊन देखील यावर चर्चा ही झालेली आहे तरीदेखील त्यामुळे ही देयके मिळवण्यासाठी उपोषणाची वेळ नाईलाजास्तव आलेली आहे असे या ठेकेदारांकडून सांगण्यात आले
बाळासाहेब बोराटे व अभिषेक कळमकर यांनी आंदोलकांची भेट घेत शिवसेना आंदोलकांच्या पाठीशी उभी असे जाहीर केले
26 जानेवारी रोजी शिवसेना नेते बाळासाहेब बोराटे व अभिषेक कळमकर यांनी आंदोलकांची भेट घेतली असून शिवसेना या आंदोलकांच्या पाठीशी उभी आहे असे जाहीर केले आहे. शिवसेना नेते बाळासाहेब बोराटे यांनी, लहान ठेकेदारांची बिले थकवून मोठे मोठे बंगले उभ्या करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच सदर आंदोलक हे सामान्य परिस्थितीतील असून महापालिकेने त्यांची थकित बिले लवकरात लवकर देऊन टाकावेत, असे म्हटले आहे तर अभिषेक कळमकर यांनी या ठेकेदारांच्या पाठीशी शिवसेना उभी आहे, असे ठाम आश्वासन दिले
