
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये आज जवळपास २ टक्क्यांनी घसरण होऊन बंद झाले. बजेटपूर्वी शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी कोसळला आहे. आज सेंसेक्स ९३८ अंक म्हणजेच १.९४ टक्क्यांनी घसरून ४७४०९.९३ वर बंद झाला. तर निफ्टीच्या अंकात ४ जानेवारीनंतर १४ हजार अंकांच्या
खाली गेला आहे. आज निफ्टी २९१ अंकांनी घसरुन १३९६७.५० वर बंद झाला. रिलायंस इंडस्ट्रीज सह बँक आणि वित्तीय कंपन्यांचे शेअर्समध्ये ज्यादा नफा दिसून आला. काही दिवसांपूर्वी सेन्सेक्सने ५० हजार अंकाचा टप्पा ओलांडला ओता. मात्र गेल्या चार दिवसात बाजारात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे २०२१ मध्ये मिळवलेली वाढ गमावल्याचं चित्र आहे दुपारी २.४० वाजता बीएसईचा सेन्सेक्स १०४२ अंक म्हणजेच २.१५ टक्क्यांनी घसरूण ४७३०५ अंकावर पोहचला होता. तर निफ्टी २८७ अंकांनी म्हणजेच २.०१ टक्क्यांनी घसरूण १३९५२ च्या पातळीवर पोहचला मागच्या आठवड्यात गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५० हजारांच्या ऐतिहासिक आणि भावनिकदृष्टयाही लक्षणीय पातळीला स्पर्श केला होता. सोमवारच्या भयंकर अस्थिर व्यवहारात सेन्सेक्स ५३०.९५ अंशांनी गडगडून ४८,३४७.५९ वर स्थिरावला होता.
