अहमदनगर (दि २७ जानेवारी २०२१) – सालाबाद प्रमाणे हजरत पिर सरकार शहा शरीफ (रहे), दर्गा दायरा नगर यांचा संदल 30 रोजी व उर्स 31 रोजी साजरा करण्यांत येणार असल्याची माहिती ट्रस्टचे चेअरमन शेख मोहम्मद साबीर लाड मोहम्मद यांनी दिली आहे. नगर शहराला लागुनच असलेल्या दर्गादायरा येथील हजरत पिर सरकार शहा शरीफ (रहे) दर्गाचा संदल व उर्स ट्रस्टचे वतीने साजरा करण्यात येणार आहे. 30 रोजी पहाटे 4.30 वाजता पांरपारीक धार्मीक पध्दतीने दर्ग्यावर संदल लावुन व फुलांचे चादरी अर्पण करुन धार्मीक फातेहा पठन करुन नारीजा व शेरणी या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच 31 रोजी उर्स साजरा करण्यात येणार आहे. कोव्हीड-19 या संसर्गजन्य रोगाचे प्रादूर्भाव रोखण्याकरीता शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करुन संदल व उर्स साजरा करण्यात येणार आहे. दर्गा आवारात खाद्यपदार्थ, खेळणी विक्रेते व दुकाने लावण्यास ट्रस्टचे वतीने कोणासही परवानगी मिळणार नाही. भाविकांनी गर्दी करु नये शासनाचे नियमांचे पालन करावे, असे आवाहन टस्टचे चेअरमन शेख मोहम्मद साबीर लाड मोहम्मद, विश्‍वस्त अ‍ॅड. शेख एन. जहागीरदार, शेख निजाम शरीफमियाँ, डॉ. सय्यद समीर शहा महेद शेख बाबामियाँ, सय्यद अत्तामियाँ पाशामियाँ व सय्यद साबीर दरवेशमियाँ तसेच समस्त समस्त वंशज दर्गादायरा गावकरी यांनी केले आहे.