
*दिनांक २६ जानेवारी, २०२१, सायं. ७ वा*
*आतापर्यंत ६९ हजार ७३१ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१५ टक्के*
*आज ८५ रूग्णांना डिस्चार्ज तर १२६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर*
अहमदनगर: जिल्ह्यात आज ८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९५१ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९ आणि अँटीजेन चाचणीत ३२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, अकोले ०१, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०३, पारनेर ०५, पाथर्डी ०४, संगमनेर ०५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १०, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०३, राहाता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०४, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०१ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३२ जण बाधित आढळुन आले. मनपा ०७, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०३, पारनेर ०८, राहाता ०५, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्येमनपा ०९, अकोले ०८, कर्जत ०२, कोपर गाव १४, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०६, पारनेर ०७, पाथर्डी ०५, राहाता ०५, राहुरी ०६, संगमनेर ०३, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या=६९७३१
*उपचार सुरू असलेले रूग्ण= ९५१
*मृत्यू=१०९२
*एकूण रूग्ण संख्या=७१७७४
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
