(छाया : सिद्धार्त दीक्षित)

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठनेते शरद पवार हे रविवारी नगरमध्ये आल्यावर आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. लॉकडाऊन नंतरच्या मोठ्या कालावधीने खा.शरद पवार नगरमध्ये आल्याने आमदार जगताप द्वियांनी व सचिन जगताप यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, आ. लहू कानडे, आ.आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,माजी आमदार नरेंद्र घुले, राहुल जगताप, शेखर घुले, जेष्ठनेते पांडुरंग आभंग, उदय शेळके, घनश्याम शेलार,नगरध्यक्षा अनुराधा आदिक आदी उपस्थित होते. जगपात कुटुंबियांच्या वतीने खा.शरद पवार यांचा आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांनी सत्कार केला.यावेळी पार्वती जगताप, जी.प.सदस्या सुवर्णा जगताप, नगरसेविका शीतल जगताप, विलास जगताप, डॉ.शशिकांत फटके, डॉ.वंदना फाटके, वैभव जगताप, विकी जगताप आदी उपस्थित होते.