
अल्पसंख्यांक विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी अब्दुल रऊफ खोकर यांची नियुक्ती
अहमदनगर ः राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी अब्दुल रऊफ खोकर यांची नियुक्ती करण्यात आली.आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते खोकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, निलेश इंगळे, अथर खान, ताज खान, शहानवाझ शेख, शहेजाद खान, अन्सार सय्यद, सरफराज कुरेशी, नसीर शेख, मिजान कुरेशी, वसीम शेख,सोफीयान शेख, अब्दुल्ला खोकर, आबिद शेख,आतीक शेख, रहिम कुरेशी, किशोर पवार, किरण पवार, विशाल खेरे, आसिफ शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी मिळत असल्याने युवावर्ग राष्ट्रवादीशी जोडला जात आहे. अल्पसंख्यांक समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचा नेहमीच पुढाकार राहिला असून, या समाजाच्या विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. साहेबान जहागीरदार यांचे सक्रीयपणे सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांना राष्ट्रवादी पक्षात आणण्याचे काम कौतुकास्पद प्रश्न मार्गी लागत असल्याने पक्षात काम करताना कार्यकर्ते व पदाधिकार्यांमध्ये एक प्रकारे आत्मविेशास निर्माण झाला असल्याचे सांगून, त्यांनी नुतन पदाधिकारीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
साहेबान जहागीरदार म्हणाले की समाजात सक्रीयपणे सामाजिक कार्य करणार्या युवकांना पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली जात आहे. अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्न शासन स्तरावर सोडविण्यासाठी व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग कार्य करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
