
अहमदनगर ः शहरात वाहतूक शाखेच्या वतीने मोठा गाजावाजा करत वातुक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जात असतांना शहरातील सर्व मोठ्या प्रमुख चौकातील सिग्नल बंद असल्याचा निषेध करत जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या नेतृत्वाखाली शक्कर चौकामध्ये वाहतूक सुरक्षा अभियान व नगर वाहतूक शाखेचा वर्धापन दिवसाचा मुहूर्त साधत वाहतूकीचा उडालेला बोजवारा, वाहतूक शाखा, मनपा, प्रशासन व निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा निषेध करत शक्कर चौकातील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या सिग्नलला चपलांचा हार घालून अनोखी गांधीगिरी केली. ते पुढे म्हणाले, मागील पाच वर्षांमध्ये अनेक वाहतूक शाखेमध्ये अधिकारी येऊन गेले. मनपा मध्ये अनेक लोकप्रतिनिधी व महापौर होऊन गेले, परंतु एकानेही रस्ते आणि वाहतूक नियंत्रण, ट्रॅफिक सिग्नल याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात रस दाखवला नाही. याचे रहस्य काय आहे हे जनतेला माहीत आहे.
आज नगर शहराची काय अवस्था आहे हे सांगायला शब्द अपुरे पडतात. स्वतःच विना नंबरची गाडी चालवून अपघात करणारे व नियम मोडणारे वेळकाढू वाहतूक अधिकारी आणि अभियानाला हिरवा झेंडा दाखवणारे पांढरे निष्क्रिय पुढारी या वाहतूक सुरक्षा अभियानाचे नुसते फोटो वर्तमानपत्रांमध्ये झळकावता आणि ते फोटो वरिष्ठांकडे पाठवून जनतेची फसवणूक करत आहेत, त्याचा निषेध म्हणून बंद सिग्नलचे फोटो देखील वरिष्ठांकडे प्रत्युत्तरादाखल पाठवत आहोत. आज जागरूक नागरिक मंचातर्फे सक्कर चौकात बंद सिग्नल ला चपलांचे हार घालून व निषेधाचे फलक लाऊन मोठे आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठनेते वसंत लोढा, प्रा.सुनील पंडित, मिलिंद मोभारकर, नितीन भूतारे आदींची निषेधार्थ भाषणे झाली. यावेळी जागरूक नागरिक मंचचे सचिव कैलास दळवी, धनेश बोगावत, बाळासाहेब भुजबळ, जय मुनोत, राजेंद्र पडोळे, नंदप्रकाश शिंदे, किशोर जोशी, दत्ता गायकवाड, योगेश गणगले, मिलिंद कुलकर्णी, राम शिंदे, सुनील कुलकर्णी, प्रसाद कुकडे, भैरवनाथ खंडागळे, अमेय मुळे, करुणा कुकडे, मयुरी मुळे, सुरेखा सांगळे, आशा गायकवाड, मोहन लुल्ला, विष्णू सामल, राजेंद्र टकले, कसबे सर, घंगाळे सर, दीपक शिरसाठ,शारदा होशिंग, प्रकाश भंडारे, विजय देशपांडे, प्रमोद मोहळे आदी सहभगी झाले होते.
