
अहमदनगर : बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावती यांचा वाढदिवस जनकल्याणकारी व सहयोग दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील यतिमखाना बोर्डिंग स्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.यावेळी बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, प्रा. अशोक डोंगरे, रमेश सोळसे, बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, पांडुरंग जाधव, अजय कुशवाह, अजित यादव, शैलेश यादव, यतिमखाना ट्रस्टचे विश्वस्त शाकिर शेख, गुफरान शेख, हारुन शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
उमाशंकर यादव म्हणाले की, बहुजन समाज पार्टी बहुजन समाजाला संघटित करुन त्यांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीने आपले असित्त्व दाखवून तेथे विकासाला चालना दिली. भाजप व काँग्रेस दोन्ही सरकार सत्तेवर असताना बहुजन समाजावर अन्याय झाला. बसपाच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय मिळणार असून, त्या दृष्टीने मायावतींचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.प्रा. अशोक डोंगरे यांनी बहन मायावतींच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टी वंचित व बहुजन समाजाला न्याय देण्याचे कार्य करीत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात देखील सर्व कार्यकर्ते उत्तमपणे योगदान देऊन वंचित व गरजूंचे प्रश्न सोडवित आहेत. मायावतींच्या रूपाने उत्तम व सशक्तपणे एक महिला आपली जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगून, त्यांच्या जीवनचरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला.करोना महामारीच्या संकटानंतर सर्वसामान्य व गरजू घटकांपुढे आर्थिक प्रश्न उद्भवला असताना, त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या भावनेने बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपचा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम पाटोळे यांनी केले. आभार अॅड. विनायक पंडित यांनी मानले.
