
अहमदनगर : आनंदधाम ते इगल प्राईड या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ फिरणार्यांची संख्या मोठी आहे व लोकांची वर्दळ पण खूप आहे. याठिकाणी फिरणार्यांना धुळीचा फार सहन करावा लागत होता. पावसाळ्यानंतर हा परिसर रोड साईडला मोठ्या प्रमाणावर माती साचली होती. या त्रासाला कंटाळून शेवटी लोकांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना फोनवर कळवले त्यांनी तात्काळ दखल घेत पालिका कर्मचारी सफाई यंत्रणा घेऊन येऊन स्वतः जातीने उपस्थित राहून संपूर्ण परिसर व रस्ता तात्काळ साफ व स्वच्छ करून घेतला रोड साईडला असलेली माती,राडारोडा कर्मचार्यांना उचलून घेण्यास सांगितले. हा परिसर स्वच्छ झाल्याने सकाळ-संध्याकाळ फिरणार्यांनी तसेच परिसरातील मान्यवर नागरिक अमोल पोखरणा, नंदुशेठ कोठारी,श्री. पोरवाल, श्री. दरक श्री. अग्रवाल, श्री. फुलसुंदर आदींनी नगरसेवक बोराटे यांना धन्यवाद दिले.
