अहमदनगरविद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामात पूर्वी सहभागी असणार्‍या कर्मचार्‍यांनी कल्याण रोड परिसरातील शिवाजीनगर परिसरातील विद्युत ट्रान्सफार्मर चोरल्याच्या संशयावरून दोन नागरिकांच्या मागावर कोतवाली गुन्हे शोध पथक असताना 1 आरोपी पळून गेला तर एकाने गुन्ह्याची कबुली दिली आहे 150,000 किमतींचा विटकरी ट्रान्सफॉर्मर व 3,00,000 रू. किमतीचा महिंद्रा कंपनीचा पिकअप पोलिसांनी जप्त केला आहे.

सदर घटनेची हकीकत अशी की दि. 10 ऑक्टोबर रोजी फिर्यादी मनिषकुमार दत्तात्रय गिड्डे रा. सोलापूर यांनी फिर्याद दिली की, मी साईदीप बीडकॉन प्रा ली पुणे या कंपनीमार्फत अहमदनगर शहरात विद्युत महामंडळ च्या विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे मागील 15 वर्षांपासून काम करतो. आमचे कंपनीमार्फत विद्युत ट्रान्सफार्मर बसवण्याचे काम अहमदनगर,यवतमाळ, अकोला, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये चालते. सदर कामाकरिता मी प्रत्येक जिल्ह्याकरिता एक सुपरवायझरची नेमणूक केली आहे.

तसेच अहमदनगर जिल्हा करिता सद्या प्रफुल्ल बुचडे यांची नेमणूक केली आहे, त्यांनी मला दि.09/10/2020 रोजी माहिती दिली की, दि. 11 ऑगस्ट 2020 रोजी आपण शिवाजी नगर कल्याण रोड अहमदनगर या ठिकाणी बसवलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर हा चोरीस गेला आहे. मी त्याबाबत खात्री केली व सदर बाबत माझा यापूर्वीचा सुपरवायझर गणेश भारत पौळ रा.बैरागवाडी ता. मोहोळ जि. सोलापूर ज्याला मी दारू पिण्याचे कारणावरून कामावरून काढून टाकले होते व कचरू भुसारी रा. आखतवाडी ता.शेवगाव जि. अहमदनगर यांनी चोरून नेल्याचा मला संशय आहे.

वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस स्टेशन येथे गु.र.नं 6043/2020 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता. गुन्हाचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना कोतवाली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील चोरीस गेला माल विद्युत ट्रांसफार्मर हा एका पिकअप वाहनात भरून तो पिकअप हा सोनई ता. नेवासा या परिसरात सोडून सदरचे आरोपी तिथून पळून गेले.

कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार व स्टाफ यांना सदर माल ताब्यात घेऊन फरार आरोपी यांचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले प्रमाणे आरोपी कचरू मच्छिंद्र भुसारी रा.आखदवाडी शेवगाव जि. अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्यास विचारपूस करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास अधिक विेशासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

ही कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विशाल शरद घुमे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर व गुन्हेशोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोना रवींद्र टाकले, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहिद शेख, भारत इंगळे, सुमित गवळी, तानाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुशील वाघेला, सुजय हिवाळे यांनी केली आहे.