छाया : अमीर सय्यद

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने तसेच सरकारी आदेशानुसार पुर्ण जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांना 29 डिसेंबर रोजी कार्यमुक्तीचे आदेश काढले आहे. याच्या विरोधात मनसेच्या पदाधिकार्‍यांनी तसेच महाराष्ट्र प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीने आज ठिय्या आंदोलन करुन या कोविड योध्दांना सरकारच्या भरती प्रक्रियेत सामिल करुन घ्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी कर्मचार्या समवेत जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, नितीन भुतारे, परेश पुरोहित आदीसह महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौधरी, उपाध्यक्ष भारती भोसले, जिल्हासचिव सचिन कसोटे आदी सहभागी झाले होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नगर जिल्ह्यात काम करणार्‍या सर्व कोविड 19 कर्मचारी (परिचारीका व इरत) कर्मचार्‍यांना जिल्हा प्रशानाने व सरकारी आदेशानुसार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांना दि.29 डिसेंबर रोजी कार्यमुक्तीचे आदेश काढले आहे. त्यामुळे अचानक आदेशाने आमची नोकरी गेलेली आहे.मुख्यमंत्र्याच्या हाकेला साथ देवून आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावून या युध्दजन्य परिस्थितीमध्ये सरकारला साथ दिली आहे. अत्यंत शुल्क मानधनावर आम्ही सर्वांनी कर्तव्य बजावले आहे. पण सरकारच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या अमानुष धोरणांमुळे आरोग्य कर्मचार्‍यांवर अत्यंत वाईट वेळ आली आहे.

काम करत असतानासुध्दा पगार हा वेळेवर होत नव्हता इतर शहरामधील चांगले पगाराची नोकरी सोडून आम्ही सेवा दिली. तरी जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी.तसेच आमच्या काही मागण्या आहेत याकडे शासनाने लक्ष द्यावे, जोपर्यंत डब्लुएचओ (जागतीक आरोग्य संघटना) जाहीर करत नाही तोपर्यंत तसेच लसिकरणापर्यंत आम्हाला कामावरुन कमी करु नये, येथुन पुढे होणार्‍या एनएचएमच्या आरोगय भरतीमध्ये सरसकट डीसीएच आणि सीसीसी मध्ये पुर्ण नगर जिल्हयात काम केलेल्या कोविड योध्दयांना नियुक्ती देण्यात यावी, शासनाच्या जाहीर होणार्‍या सरळसेवा भारीमध्ये कोविड योध्यांना प्राधाय क्रम देण्यात यावा, आशकालीन कर्मचारी घोषित करुन शासनाच्या विविध विभागातील जागा ठेवणे आदी मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने अमरण उपोषणाचा व तीव्र राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.