अहमदनगर – अहमदनगर पहिली मंडळी (सीएनआय) चर्चमध्ये नववर्ष स्वागतानिमित्त कँडल लाईट सर्व्हीस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेव्हरंड जे. के.वाघमारे यांनी धार्मिक संदेश दिला. यावेळी रेव्हरंड सुनील रणनवरे व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेव्हरंड वाघमारे म्हणाले की, दरवर्षी नाताळ सणानंतर नववर्षाच्या पूर्वसंध्येला कँडल लाईट सर्व्हिस रॅलीचे आयोजन करण्यात येत असते. मानव जीवन प्रकाशमय व सुखमय करण्यासाठी नाताळनंतर या माध्यमातून अध्यात्मरुपी प्रकाश सर्व मंडळींपर्यंत पोहोचवला जातो. या वर्षी कोरोना विषाणूमुळे शासन निर्देशांचे पालन करीत ही रॅली संपूर्ण शहरात न काढता केवळ चर्च परिसरात काढण्यात आली व सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी मनस्विनी सोंतले, खजिनदार सॅम्युअल खरात, प्रसन्ना शिंदे, अजित ठोकळ, राहुल थोरात, हर्षल जाधव, शमशोन शिंदे, ऋतिक चांदेकर, पीटर शिंदे, प्रथमेश शिंदे, स्मितिष जाधव, लुकस शिंदे, हर्षल पाटोळे, स्तवन साळवे, अहरव पतरे, मृदुल भोसले, जोएल सूर्यवंशी, सॅम्युअल पिंटो, वैभव साळवे, संदेश लाड, आशिष चांदेकर, स्तवन जाधव,सुधीर जाधव, तन्मय क्षेत्रे,जय वानखेडे, गौरव म्हस्के, आशिष व्हेनोन, तुषार पोळ आदींसह समाजबांधव उपस्थित होते.