
अहमदनगर : समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येवून काम केल्यामुळे समाजाची प्रगती होते. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सावेडी गांवठाण येथे मनपाच्या माध्यमातून बौध्दविहार बांधून एक प्रकारे शांततेचा संदेश देण्याचे काम केले आहे. नगर शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दोनमजली सुसज्ज इमारत बांधून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. करोना संकट हळूहळू दूर होत असून देश पूर्वपदावर येत आहे. विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. नगर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी आरपीआय पक्ष वाढविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे नगर शहराशी एक माझे नाते जोडले आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.सावेडी गांवठाण येथे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रयत्नातून बांधलेल्या सुसज्ज बौध्दविहारचा लोकार्पण सोहळा ना. आठवले यांच्या हस्ते झाला.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्रभैय्या गंधे, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक रवींद्र बारस्कर, राहुल कांबळे, उदय कराळे, विलासराव ताठे, अशोक वाकळे, बाळासाहेब वाकळे, किशोर वाकळे, नितीन शेलार, पुष्कर कुलकर्णी, नीलेश जाधव, शिवा आढाव, शुभम वाकळे, अजय साळवे, दीपक मेढे, सदाशिव भिंगारदिवे, जयाताई गायकवाड,विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, पप्पू भिंगारदिवे, शुभम भिंगारदिवे, बाळासाहेब जगताप, अरूण भिंगारदिवे, मिलींद भिंगारदिवे, बाबासाहेब भिंगारदिवे,राहुल भिंगारदिवे, पप्पू गर्जे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगरमध्ये सामाजिक न्याय भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा होईल. यावेळी जयाताई गायकवाड म्हणाल्या की, महापौर वाकळे यांनी आमच्या वस्तीमध्ये एक बौध्दविहार बांधून दिले. त्यामुळे या सभागृहात आम्हाला सामाजिक उपक्रम राबविण्यास मदत होणार आहे. यावेळी आठवले यांनी महापौर वाकळे व भाजप शहराध्यक्ष महेंद्रभैय्या गंधे यांचे कवितेच्या माध्यमातून कामाचे कौतुक केले.कवितेच्या ओळीमुळे उपस्थितांमध्ये एकच हास्य जल्लोष झाला.
