अहमदनगर शहरात पहिल्याच्या तुलनेत कोरोना रुग्ण कमी आढळत असले तरी. कोरोना चे नवीन विषाणू काही देशात आले असल्याचे आणी त्या देशाने परत लॉक डाऊन केले असल्याचे प्रसार माद्यमातून समजते. त्याच बरोबर इंग्लंड या देशातही कोरोना पेक्षा भयंकर विषाणू आल्याचे समजते. काही दिवसात भारतात काही भारतीय नागरिक विदेशातून भारतात आले असून त्यात इंग्लंड येथून ही नागरिक आले आहे. त्यातील ११ नागरिक इंग्लंड येथून आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात आले आहे.

ज्या प्रमाणे कोरोना काळात अहमदनगर महानगर पालीकेने घंटा गाडी चा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात तब्लीग जमात आणी त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आव्हान केले होते व न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केले गेले. त्याच पद्धतीने आपण महाराष्ट्राचे मुख्य मंत्री या नात्याने अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांना व अहमदनगर महानगर पालीका आयुक्त साहेबांना तातडीचे आदेश करावे की त्यांनी अहमदनगर शहरात फिरत असलेल्या कचरा गाडीचा म्हणजेच घंटा गाडी चे भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात ती गाडी फिरवावी आणी जनतेला आव्हान करावे की जे इंग्लंड येथून आलेले नागरिकांच्या संपर्कात आले त्यांनी स्वताहून कोरोना चाचणी करावी अन्यथा त्यांचेवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल. अशी मागणी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री साहेब यांना इ – मैल द्वारे केले. त्याची प्रत मा. अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब आणी अहमदनगर महापालिका आयुक्त यांना देण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष यांनी अहमदनगर पालिकेने प्रसार माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्याचेही निवेदनात लिहिले आहे.

यावेळी हाजी जावेद शेख – जिल्हा महासचिव, कादिर शेख – जिल्हा संपर्क प्रमुख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शानावाज तांबोळी – विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष,असिफ सुलतान – नगरसेवक, अमीर खान – मास शहर अध्यक्ष मुसैफ शेख, सलमान खान,समीर बेग ,फिरोज शेख,आरिफ सय्यद आदींचे सह्या आहेत