अहमदनगर (दि २२ डिसेंबर २०२०) : जिल्हा दंडाधिकारी म्हणून अहमदनगर महानगर पालिका हद्दीत कलम १४४ लागू करत आहे राज्य शासनाने दिलेल्या आदेशा नुसार कोरोना विषाणू चा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व महानगर पालिका हद्दीत सायंकाळी ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही रस्त्यावर सार्वजनिक वाहतूक,संचार करणे,फिरणे, उभे राहणे ,थाम्बुन राहणे रेंगाळणे असे करण्यास सक्त मनाई असल्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा दण्डधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी नुकतेच काढले आज रात्री ११ पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु होईल