
*दिनांक: २२ डिसेंबर, २०२०, रात्री ७-१५वा
*आतापर्यंत ६५ हजार ६५५ रुग्ण बरे होऊन परतले घरी
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के
*आज १४४ रुग्णांना डिस्चार्ज तर १२० बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर: जिल्ह्यात आज १४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ६५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११३२ इतकी झाली आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४३ आणि अँटीजेन चाचणीत ७७ रुग्ण बाधीत आढळले
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०२, राहाता ०३, राहुरी ०२, संगमनेर ०४, श्रीरामपूर ०१, इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ७७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १३, कर्जत ०४, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०२, पाथर्डी १४, राहाता ०९, संगमनेर १५, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०२ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ०५, कर्जत ०४, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०८, पाथर्डी २३, राहाता ०८, राहुरी ०३, संगमनेर २०, शेवगाव ०२, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २१, कॅन्टोन्मेंट ०२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
