
56 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाला संबोधित केले
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कॅम्पस म्हणजे एकप्रकारे ‘मिनी इंडिया’ आहे अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.नरेंद्र मोदी म्हणाले, “मला अनेक जण सांगतात एएमयू कॅम्पस एका स्वतंत्र शहराप्रमाणे आहे. अनेक विभाग, डझनभर हॉस्टेल्स, हजारो शिक्षक-विद्यार्थी यांच्यात मिनी इंडिया दिसून येतो. इथे एका बाजूला उर्दू शिकवली जाते तर हिंदीचेही शिक्षण दिले जाते. अरब आणि संस्कृतही शिकवली जाते.”या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि एएमयू विद्यापीठाचे कुलगुरू सैयदना मुफद्दल सैफुद्दीन उपस्थित होते.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका पोस्टाच्या तिकिटाचेही प्रकाशन करण्यात आले.56 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाला संबोधित केले. यापूर्वी 1964 मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाला संबोधित केले होते.
नरेंद्र मोदी म्हणाले “एएमयूमध्ये उर्दू, फारसी आणि संस्कृत,अरबी भाषेवर संशोधन केले जाते हे कौतुकास्पद आहे
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “एएमयूमध्ये उर्दू, फारसी आणि संस्कृत,अरबी भाषेवर संशोधन केले जाते. हे कौतुकास्पद आहे. देशाच्या समृद्धीसाठी प्रत्येक स्तरावर त्याचा विकास होणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाला कोणताही भेदभाव न करता सोयी-सुविधांचा लाभ होण्याच्या दिशेने देश पुढे जात आहे. प्रत्येक नागरिक राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराबाबत सजग आहे. आणि देश आज त्या मार्गावर पुढे जात आहे. धर्मामुळे कुणीही मागे राहू नये या दिशेने देश पुढे जात आहे.”कुणालाही त्याच्या राज्यघटनात्मक हक्कांपासून वंचित राहू दिलं जाणार नाही अशी ग्वाही मोदींनी दिली.मुस्लीम मुलींच्या शिक्षणाला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.ते म्हणाले, “मुस्लीम मुलींचा शाळाबाह्य होण्याचा दर कमी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर आणि सशक्तीकरणाकडे सरकार लक्ष देत आहे.”तसेच इतर विद्यापीठांनीही मुलींच्या उच्च शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
