अहमदनगर (दि २१ डिसेंबर २०२०) – नगर तालुक्यातील इसळक निंबळक येथील जागृत देवस्थान खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्टी उत्सव साजरा झाला. भाविकांनी दुपारी दर्शन घेऊन आरती साठी हजेरी लावली होती. जय मल्हारच्या घोषणा देत भाविकांनी भंडारा व खोबर्याची मुक्तपणे उधळण केली.